Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

Vaibhav Suryavanshi Century : 7 षटकार, 7 चौकार! वैभव सूर्यवंशीने महाराष्ट्राच्या गोलंदाजांना झोडून काढलं, शतक ठोकत रचला इतिहास

Vaibhav Suryavanshi Century News : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मधील सलग तीन सामन्यांत अपेक्षेपेक्षा कमी कामगिरीमुळे वैभव सूर्यवंशीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

Vaibhav Suryavanshi Century in Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मधील सलग तीन सामन्यांत अपेक्षेपेक्षा कमी कामगिरीमुळे वैभव सूर्यवंशीवर (Vaibhav Suryavanshi) मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. अनेकांनी त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण या सर्व टीकेला वैभवने आपल्या बॅटनेच योग्य उत्तर दिलं. चौथ्या सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध मैदानात उतरताच वैभवने जबरदस्त शतक झळकावलं. खास म्हणजे त्याने षटकार मारत शतक पूर्ण केले. वैभवने आपल्या शतकात जितके षटकार ठोकले तितकेच चौकारही मारले आणि फक्त 58 चेंडूंत शतक ठोकले.

Advertisement Box

61 चेंडूंत नाबाद 108 धावा

महाराष्ट्राविरुद्ध बिहारने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 3 गडी गमावून 176 धावांचा टप्पा गाठला. यात उपकर्णधार वैभव सूर्यवंशीने एकहाती नाबाद 108 धावा केल्या. 177 पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने खेळलेल्या या इनिंगमध्ये त्याने केवळ 61 चेंडूत 7 षटकार आणि 7 चौकार मारले. ओपनर म्हणून उतरलेल्या वैभवची बिपिन सौरभसोबत मोठी भागीदारी जमली नाही. त्यानंतर पीयूषसोबतही जास्त वेळ टिकता आलं नाही. मात्र तिसऱ्या विकेटसाठी आकाश राजसोबत त्याने अर्धशतकी भागीदारी रचत संघाला चांगल्या स्थितीत आणले.

14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आकाश राज बाद झाला तेव्हा बिहारचा स्कोर 3 बाद 101 असा होता. त्यानंतर वैभवने केवळ धावांचा वेगच वाढवला नाही, तर हात मोकळे करत अर्धशतक गाठलं आणि त्याच धडाक्यात शतकाची उंबरठाही पार केली. पहिल्या तीन सामन्यांत मिळून फक्त 32 धावा करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने चौथ्या सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध तडाखेबाज शतक झळकावलं. विशेष म्हणजे SMAT कारकिर्दीतलं हे त्याचं पहिलंच शतक ठरलं.

वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला

क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवल्यापासून 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी एकामागून एक तुफानी कामगिरी करत आहे. आता, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध शतक झळकावून, वैभवने इतिहास रचला आहे. सूर्यवंशी वयाच्या 14 व्या वर्षी आणि फक्त 17 टी-20 सामन्यांमध्ये, तीन टी-20 शतके झळकावणारा जगातील पहिला तरुण खेळाडू बनला आहे. खरंच, क्रिकेट इतिहासात कोणत्याही खेळाडूने इतक्या लहान वयात ही कामगिरी केलेली नाही. तीन सामन्यांतील अपयशानंतर असा दमदार पुनरागमन करत वैभव सूर्यवंशीने संघाचं मनोबल उंचावलं असून आगामी सामन्यांसाठीही तो तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

'ऑपरेशन सिंदूर' के बाद दुनिया के सामने रोज बेनकाब हो रहे पाकिस्तान को दी गई एक अरब डॉलर की मदद पर क्या अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष को फिर से विचार करना चाहिए?

Advertisement Box

गुरुवार, 5 मार्च 2026

आजचा सुविचार

मनःशांती हे सर्वात मोठे संपत्ती आहे. ती बाह्य परिस्थितीत शोधण्याऐवजी आपल्या आत शोधा. जेव्हा आपले मन शांत असते, तेव्हा सर्वात कठीण परिस्थिती देखील सोपी वाटू लागते. आंतरिक शांती हीच खरी समृद्धी आहे.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp