Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

मुंबईतील मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत का? मराठी अभ्यास केंद्रातर्फे महापालिकेवर धडकणार मोर्चा

मुंबईतील अनेक भागांतील मराठी शाळा बंद पडत आहेत. याविरोधात मराठी अभ्यास केंद्राने आता आवाज उठवला आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी १८ डिसेंबर रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाद्वारे शाळांचे पाडकाम थांबवण्याची मागणी केली जाईल. मराठी शाळांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी पालकांनी आग्रह धरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मराठी शाळांचा स्थितीदर्शक अहवाल तयार करण्याचीही मागणी केली आहे

माहीम, गोवंडी, शिवडी, मानखुर्द, खार, वांद्रे, भांडूप, कुलाबा अशा मुंबईच्या प्रत्येक भागातील मराठी शाळा ठरवून बंद पाडल्या जात असून त्याविरोधात आता मराठीजनांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे सांगत मराठी अभ्यास केंद्राने मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यसंकुलातील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या मराठी शाळांबाबतच्या परिषदेदरम्यान मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी या निर्णयाची घोषणा केली. मराठी शाळा वाचवण्यासाठी कृतीशील कार्यक्रमासोबतच आंदोलनाची जोड हवी असून गुरुवार, १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा मोर्चा निघेल, असे ते म्हणाले.

Advertisement Box

मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना शोधण्यासाठी आणि वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राने आयोजित केलेली ‘ठरवून बंद पाडलेल्या/पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद’ रविवारी दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात पार पडली. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि पालकांच्या उपस्थितीत मराठी शाळांच्या सद्यस्थितीवर विचारमंथन झाले आणि पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. पवार बोलत होते.

मराठी शाळा, मराठी भाषा वाचवण्यासाठी आंदोलने होतच राहतील. पण त्याचसोबत कृतीशील कार्यक्रम घेणेही गरजेचे आहे. त्यासाठी मराठी शाळांबाबत सकारात्मक विचार करणाऱ्यांनी आपल्या मुलांना-नातवंडांना मराठी शाळांमध्ये टाकण्याचा आग्रह धरला पाहिजे, असेही ते म्हणाले. आंदोलनाच्या माध्यमातून मराठी शाळांचे पाडकाम थांबवले जाऊ शकते. त्या शाळांच्या जागी इतर काही उभे राहणार नाही, याची खातरजमा केली जाऊ शकते. पण नव्याने उभारलेल्या इमारतीत मराठी शाळाच सुरू राहील, यासाठी त्या शाळेत मुले शिकणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. तसेच महापालिकेने मराठी शाळांचा स्थितीदर्शक अहवाल तयार करावा, मराठी शाळांच्या इमारतींच्या जागी पुनर्बाधणीनंतर फक्त शाळाच उभी राहावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या परिषदेत लोअर परळ येथील राजुजी मानाजी चाळ शाळेबद्दल विजय मोरे, गोवंडीच्या रफीकनगर शाळेबद्दल जालिंदर सरोदे, मानखुर्दच्या चेंबूर माध्यमिक शाळेबद्दल संतोष सुर्वे, शिवडीच्या दोन ऑक्टोबर वसाहत शाळेबद्दल शिवनाथ दराडे, न्यू माहीम आणि मोरी रोड शाळेबद्दल प्रणाली राऊत, विक्रोळीच्या टागोरनगर शाळेबद्दल डॉ. योगेश भालेराव, मानखुर्द गावातील शाळेबद्दल संगीता कांबळे आणि मुंबईतील शाळांबद्दल एफ. एम. इल्यास यांनी मांडणी केली. त्यानंतर माहिती अधिकार तज्ज्ञ सुरेश हेगिष्टे (फोरम फॉर जस्टीस), नाशिकच्या ‘शाळा वाचवा समिती’चे दीपक डोके, तसेच संपर्क संस्थेचे उत्पल व. बा. यांनी विविध मुद्द्यांद्वारे मराठी शाळा वाचवण्यासाठीची मोहीम कशी पुढे नेली जाऊ शकते, याबाबत मार्गदर्शन केले.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

'ऑपरेशन सिंदूर' के बाद दुनिया के सामने रोज बेनकाब हो रहे पाकिस्तान को दी गई एक अरब डॉलर की मदद पर क्या अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष को फिर से विचार करना चाहिए?

Advertisement Box

मंगळवार, 3 मार्च 2026

आजचा सुविचार

यश हे अंतिम नाही आणि अपयश प्राणघातक नाही; महत्त्वाचे म्हणजे आपण सतत पुढे जाण्याचे धाडस ठेवता की नाही. प्रत्येक अडथळा आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतो, खाली पाडण्यासाठी नाही. धैर्य आणि हिमत हेच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहेत.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp