Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

क्रिकेट प्रॅक्टीससाठी 70 KM पायपीट; ट्रक ड्रायव्हरचा मुलगा 2 तासांत करोडपती; RCB कडून IPL गाजवणार

मंगेश यादव याने संघर्षातून क्रिकेटमध्ये यश मिळवत RCB कडून 5 कोटी 20 लाख रुपयांना आयपीएल 2026 मध्ये निवड मिळवली, वडील रामअवध यादव यांच्या कष्टाला मान्यता मिळाली.

Advertisement Box

लहानपणापासून गरीबी पाहिली, जगण्यासाठी संघर्ष, घरात आधीच पैसे कमी त्यामुळे फार स्वप्न पूर्ण होतील याची शाश्वती नसताना वडिलांनी मात्र खंबीर आधार दिला. वडिलांनी मुलाच्या पाठीवर हात ठेवला आणि क्रिकेट खेळण्यासाठी बळ दिलं. वडील ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतात. घरात फार बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने सुखसोई फार नाहीतच.

बारावीपर्यंत शिक्षण घेता आलं. क्रिकेटची प्रॅक्टीस करण्यासाठी 70 किमी रोज पायपीट करावी लागत होती. हे सगळं असताना अचानक आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनने मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका छोट्या गावाचा मुलगा एका रात्रीत देशभरात चर्चेत आला.

24 वर्षीय वेगवान गोलंदाज मंगेश यादव याची रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) टीमने तब्बल 5 कोटी 20 लाख रुपयांना आपल्या टीममध्ये समाविष्ट करून घेतलं. यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाणार आहे. अवघ्या 30 लाख रुपयांच्या बेस प्राइसपासून सुरू झालेला हा प्रवास मंगेशसाठी स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल आहे.

ही केवळ मंगेशचीच नाही, तर त्याच्या ट्रक ड्रायव्हर वडील रामअवध यादव यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी आहे. मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी रामअवध यादव यांनी महिनोन्‌महिने घरापासून दूर राहून ट्रक चालवला. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत, मुलाच्या स्वप्नासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य ट्रक चालवून, बाहेर राहून घालवलं. त्या कष्टांचं फळ अखेर अबू धाबीतील आयपीएल लिलावात मिळालं.

मंगेश यादव आपल्या वेग, अचूक यॉर्कर आणि धडाकेबाज बॉलिंगसाठी ओळखला जातो. मध्य प्रदेश टी-20 लीगमध्ये त्याने केलेली कामगिरी निवड समित्यांचं लक्षवेधी ठरली. सहा सामन्यांत 14 विकेट्स, त्यात तीन वेळा चार विकेट्सची कामगिरी आणि एका सामन्यात तीन ओव्हरमध्ये अवघ्या 18 धावांत चार गडी बाद करण्याची कामगिरी, ह्या सगळ्याचं चीज या आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये झालं.

याच वर्षी मंगेशने सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मध्य प्रदेशकडून पदार्पण केलं. दोन सामन्यांत तीन विकेट्स घेतल्या, शिवाय फलंदाजीतही 12 चेंडूंमध्ये 28 धावांची उपयुक्त खेळी करत त्याने स्वतःला अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्ध केलं. मंगेशचा जन्म 10 ऑक्टोबर 2002 रोजी पांढुर्णा जिल्ह्यातील बोरगाव येथे झाला. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही त्याने क्रिकेटची स्वप्नं सोडली नाहीत. त्याचा सरावाचा प्रवासही संघर्षाने भरलेला होता.

वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत मंगेश दररोज तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास करून छिंदवाड्यातील इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये सरावासाठी जात असे. कोच उत्सव बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्वतःला घडवत ठेवलं.

मंगेशच्या आयपीएल निवडीची बातमी कळताच त्याच्या वडिलांचा आनंद शब्दात मावणारा नव्हता. घरात आनंदाचं वातावरण असून, गावातही अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते नकुलनाथ यांनीही मंगेशच्या वडिलांशी बोलताना त्यांना शुभेच्छा दिल्या. मंगेशच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. वडिलांच्या डोळ्यात आनंद होता.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने एपल प्रमुख टिम कुक से आईफोन का निर्माण भारत में न करने को कहा है। क्या इसका असर देश के स्मार्टफोन उद्योग पर पड़ सकता है?

Advertisement Box

गुरुवार, 5 मार्च 2026

आजचा सुविचार

मनःशांती हे सर्वात मोठे संपत्ती आहे. ती बाह्य परिस्थितीत शोधण्याऐवजी आपल्या आत शोधा. जेव्हा आपले मन शांत असते, तेव्हा सर्वात कठीण परिस्थिती देखील सोपी वाटू लागते. आंतरिक शांती हीच खरी समृद्धी आहे.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp