Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

भाविकांसाठी महत्त्वाचं! मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर सलग पाच दिवस बंद; कधी आणि का?

भाविकांना दुपारी ठीक १.०० वाजल्यापासून नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून श्रींचे दर्शन घेता येईल.  भाविकांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी केले आहे.

मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील मुख्य मूर्तीला ‘सिंदूर लेपन’ करण्यात येणार आहे. यामुळे येत्या ७ जानेवारी ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत भाविकांना श्रींच्या मुख्य मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सिद्धिविनायक मंदिर 5 दिवस बंद 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  ​मंदिराच्या परंपरेनुसार, ठराविक काळानंतर श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्याची प्रक्रिया पार पडते. बुधवारी (७ जानेवारी) या विधीला सुरुवात होणार असून रविवारी (११ जानेवारी) तो पूर्ण होईल. या पाच दिवसांच्या काळात मुख्य मूर्ती सिंदूर लेपनासाठी झाकलेली असल्याने गाभाऱ्यातून दर्शन बंद राहील.

Advertisement Box

मात्र, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी न्यासाने पर्यायी व्यवस्था केली आहे. या काळात भाविकांना श्रींच्या ‘प्रतिमूर्तीचे’ दर्शन घेता येणार आहे. ​सिंदूर लेपनाचा विधी पूर्ण झाल्यानंतर, सोमवार १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीचा प्रोक्षणविधी, नैवेद्य आणि आरती पार पडेल. त्यानंतर दुपारी ठीक १.०० वाजल्यापासून भाविकांना नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून श्रींचे दर्शन घेता येईल.  भाविकांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी केले आहे.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

आमिर की अगली फिल्म 'सितारे जमीन पर' का ट्रेलर हाल ही में रिलीज हुआ। क्या यह फिल्म आमिर को बॉक्स ऑफिस पर सफलता दिला पाएगी?

Advertisement Box

मंगळवार, 3 मार्च 2026

आजचा सुविचार

यश हे अंतिम नाही आणि अपयश प्राणघातक नाही; महत्त्वाचे म्हणजे आपण सतत पुढे जाण्याचे धाडस ठेवता की नाही. प्रत्येक अडथळा आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतो, खाली पाडण्यासाठी नाही. धैर्य आणि हिमत हेच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहेत.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp