Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

निवडणूक आदेश नाकारणाऱ्या ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हा दाखल

ठाणे – दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवरील कामकाजाकरिता निवडणूक विभागाकडून बजावण्यात आलेले आदेश नाकारल्याप्रकरणी ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल या शाळेच्या मुख्याध्यापकांवर मा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.

Advertisement Box

मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर विविध शासकीय-निमशासकीय आस्थापना तसेच खासगी शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे कर्मचारी ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल शाळेत नियुक्तीचे आदेश बजावण्यासाठी गेले असता शाळेच्या मुख्याध्यापिका विमलेश सिंधू यांनी आदेश स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर दुसऱ्यांदाही अधिकृतरीत्या आदेश बजावण्यात आले, मात्र तरीही शाळेकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. यावर ठाणे महापालिका प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली, ती स्वीकारण्यास देखील शाळेने नकार दिला.

निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करणे हे कायद्याने बंधनकारक असून मतदानाचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या कर्तव्याचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून निवडणूक कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी महापालिका निवडणूक विभागाने रेन्बो इंटरनॅशनल शाळेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित मुख्याध्यापिका व शाळेविरोधात भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 व इतर अनुषंगिक कलमांन्वये पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.निवडणूक कामात अडथळा आणणे,आदेशांचे उल्लंघन करणे व शासकीय कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखणे हे गंभीर व दंडनीय अपराध असून,अशा प्रकारांबाबत पालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व सुरळीत पार पडण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्था, खासगी आस्थापना व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच 14 व 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारी गैरहजर राहिल्यास त्यांना कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल,असा इशाराही आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिला आहे.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

'ऑपरेशन सिंदूर' के बाद दुनिया के सामने रोज बेनकाब हो रहे पाकिस्तान को दी गई एक अरब डॉलर की मदद पर क्या अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष को फिर से विचार करना चाहिए?

Advertisement Box

मंगळवार, 3 मार्च 2026

आजचा सुविचार

यश हे अंतिम नाही आणि अपयश प्राणघातक नाही; महत्त्वाचे म्हणजे आपण सतत पुढे जाण्याचे धाडस ठेवता की नाही. प्रत्येक अडथळा आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतो, खाली पाडण्यासाठी नाही. धैर्य आणि हिमत हेच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहेत.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp