BMC Elections Impact WPL 2026: सध्या मुंबईत बीएमसी निवडणुक 2026 चे वातावरण पाहायला मिळत आहे. या निवडणुकीचा परिणाम आता क्रिकेटच्या सामन्यांवर पडणार आहे. चाहत्यांना दोन सामने घरी बसूनच बघावे लागणार आहे.
बीएमसी निवडणुकीमुळे WPL 2026 ला फटका बसू शकतो. बीएमसी निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार आहेत आणि त्याच दिवशी मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील डब्ल्यूपीएल 2026 चा सामना खेळवला जाईल. निवडणुकीमुळे 14 आणि 15 जानेवारी रोजी होणाऱ्या डब्ल्यूपीएल सामन्यांमध्ये प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही असे वृत्त आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी रिकाम्या स्टेडियममध्ये डब्ल्यूपीएल सामने आयोजित करण्याच्या शक्यतेवर आपले मत व्यक्त केले.
बीएमसी निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार आहेत आणि मतमोजणी 16 जानेवारी रोजी होईल. बीसीसीआयने 16 तारखेबद्दल फारशी चिंता व्यक्त केलेली नाही, परंतु देवजीत सैकिया यांनी आग्रह धरला की 14 आणि 15 तारखेला रिकामी स्टेडियममध्ये सामने खेळवावे.”
महिला प्रीमियर लीगचे सर्व सामने 17 जानेवारीपर्यंत नवी मुंबईत खेळवण्यात येणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स बीएमसी निवडणुकीच्या एक दिवस आधी 14 जानेवारी रोजी खेळतील. यूपी संघ दुसऱ्या दिवशी, म्हणजे निवडणुकीच्या दिवशी देखील मैदानात उतरेल, परंतु यावेळी त्यांचा सामना घरच्या संघ मुंबई इंडियन्सशी होईल.







