Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

‘देवखेळ’ या वेब सीरिजवर बंदी घालण्याची ठाकरेंच्या शिलेदाराची मागणी; म्हणाले, ‘कोकणातील कलांवर घाला घालण्याचं काम…’

Devkhel Web Series : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी ‘देवखेळ’ या वेब सीरिजवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केलीये.

मुंबई – प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांच्या ‘देवखेळ’ या वेब सीरिजची चर्चा सर्वत्र आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोकणवासियांनी या वेब सीरिजचा विरोध केलाय. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही ‘देवखेळ’ या वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

कोकणात शिमगोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. मुंबईतून चाकरमानी खास शिमग्याला गावी जातात. शिमग्यामध्ये पारंपारिक लोकनृत्य, खेळे असतात. घरोघरी पालखी घेऊन जातात. पालखीसोबत शंकासूराच्या वेशात असलेली माणसं जातात. याच, पार्श्वभूमीवर ‘देवखेळ’ ही वेब सीरिज आधारित आहे. मात्र, यामध्ये शंकासूर पापी माणसांना मारतो, असं दाखवण्यात आलं आहे. वेब सीरिजमध्ये असं चित्रण केल्यामुळे कोकणवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणूनच आमदार भास्कर जाधव , ‘देवखेळ’ ही वेब सीरिज तत्काळ बंद करावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात भास्कर जाधव यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी निवेदन दिलं आहे.

Advertisement Box

भास्कर जाधव यांचं निवेदन

या निवेदनात भास्कर जाधव यांनी लिहिलं की, ‘कोकणातील शिमगा उत्सवातील संकासूर हे एक पारंपारिक, पौराणिक आणि भक्तीमय लोकनृत्य पात्र आहे. काळया रंगाचा पोशाख, विचित्र मुखवटा आणि हातात वेत घेवून गोमूसोबत घरोघरी फिरणारा संकासूर हा शिवाचा अवतार मानला जातो आणि गावकऱ्यांना आशीर्वाद देतो, हे आपल्याला माहितच असेल. कारण आपणसुध्दा कोकणातीलच आहात. परंतु, झी ५ या मराठी ओटीटीवर ३० जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या ‘देवखेळ’ नामक वेबसीरिजमध्ये संकासूर खूनी असल्याचे दाखविण्यात आले आहे. या वेबसीरिजचे चित्रिकरण माझ्याच मतदारसंघात गुहागर तालुक्यात सुरू असून सध्या यावरून गुहागरसह संपूर्ण कोकणात प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे.’

Bhaskar Jadhav

‘कोकणातील संकासूर हे देवाचे रूप मानले जाते. तो फक्त शिमगा उत्सवामध्ये बाहेर पडतो. संकासूराचे खेळे केवळ मनोरंजन नसून ती पूर्वापार चालत आलेली भक्ती आणि संस्कृतीची परंपरा आहे. परंतु, देवखेळ’ या वेबसिरिजमध्ये संकासूराला कूर आणि अंधश्रध्दा पसरविणारा म्हणून दाखविण्यात आले आहे. आम्ही संकासूरावर डॉक्यूमेंट्री करत आहोत, असे ग्रामस्थांना खोटे सांगून मालिकेचे चित्रिकरण करण्यात आले. हीदेखील अत्यंत गंभीर बाब आहे. याबाबत गुहागर पोलिसांपासून जिल्हा पोलीस अधिक्षकांपर्यंत तक्रार नोंदवूनही अदयाप कोणतीही कारवाई न झाल्याने गुहागरसह कोकणातील नमन, भजन मंडळांतीलकलाकारांसहसर्वसामान्य जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काळाच्या ओघात अनेक पारंपारिक कला लोप पावत असताना कोकणात मात्र विशेष करून कुणबी समाजाने अनेक कला जिवंत ठेवल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही अनेक अडीअडचणींवर मात करत त्यांनी गावागावात नमन मंडळे केवळ टिकवून ठेवली नाहीत तर ती सातासमुद्रापार पोहोचवली आहे. त्यामध्ये संकासूर देखील आहे. कोकणातील या कलांवर घाला घालण्याचे आणि त्यांना बदनाम करण्याचे काम अशा वेबसिरिजच्या माध्यमातून सुरू असल्याने संतापाची लाट उसळली आहे.’

‘याचे पडसाद उमटून अनुचित प्रकार घडून नये म्हणून सिनेमास्टर्स प्रोडक्शन प्रा. लि. निर्मित ‘देवखेळ’ या वेबसिरिजवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी माझी आपणास विनंती आहे.’ असं भास्कर जाधव यांनी शेवटी लिहिलं आहे.

 

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने एपल प्रमुख टिम कुक से आईफोन का निर्माण भारत में न करने को कहा है। क्या इसका असर देश के स्मार्टफोन उद्योग पर पड़ सकता है?

Advertisement Box

मंगळवार, 3 मार्च 2026

आजचा सुविचार

यश हे अंतिम नाही आणि अपयश प्राणघातक नाही; महत्त्वाचे म्हणजे आपण सतत पुढे जाण्याचे धाडस ठेवता की नाही. प्रत्येक अडथळा आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतो, खाली पाडण्यासाठी नाही. धैर्य आणि हिमत हेच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहेत.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp