डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरानं नवा उच्चांक केला आहे

सोने चांदीच्या दरात पुन्हा एकदा तेजी सुरु झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात 3500 रुपयांची वाढ झाली. तर,सोन्याच्या दरात देखील 1200 रुपयांची वाढ झाली आहे.
चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी चांदीचा दर 174981 रुपये होता. आज बाजार सुरु होताच चांदी 176452 रुपयांवर पोहोचली. त्यानंतर चांदीच्या दरानं 178489 रुपयांचा उच्चांक गाठला. म्हणजेच चांदीच्या दरात 3508 रुपयांची तेजी पाहायला मिळाली
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 फेब्रुवारीच्या एक्सपायरीच्या न्याचे दर 130794 रुपयांवर होते. शुक्रवारी सोन्याचा दर 129504 रुपयांवर होता. म्हणजेच एमसीक्सवर सोन्याच्या दरात 1290 रुपयांची वाढ झाली.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरानं 134024 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यापेक्षा सध्याचा सोन्याचा दर 4000 रुपयांनी कमी आहे.
देशांतर्गत बाजारातील सोन्याचा दर पाहिला असता आयबीजेएच्या वेबसाईटनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 128600 रुपये एक तोळा इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 125520 रुपये इतका आहे. तर, 20 कॅरेट सोन्याचा दर 114460 रुपये इतका आहे. 18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 104170 रुपये इतका आहे. तर 14 कॅरेट सोन्याचा दर 8295 इतका झाला आहे.

आयबीजेएकडून जाहीर केले जाणारे दर देशभरात सर्वत्र सारखे असतात. आयबीजेएचे दर जीएसटीशिवायचे असतात. सोन्यावर 3 टक्के जीएसटी आकारला जातो. याशिवाय मेकिंग चार्जेस वेगळे द्यावे लागतात.








