Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

Asia Cup Under-19 2025 : टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक; आयुष म्हात्रे अन् वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानला दाखवला घाट

India beat Pakistan U19 Asia Cup 2025 : अंडर 19 आशिया कप 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 6 सामने खेळवले गेले आहेत. ग्रुप A मधील रविवारी झालेल्या महत्त्वाच्या लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानला लोळवलं.

Asia Cup Under-19 2025 Points Table : अंडर 19 आशिया कप 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 6 सामने खेळवले गेले आहेत. ग्रुप A मधील रविवारी झालेल्या महत्त्वाच्या लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानला लोळवलं. या विजयासह टीम इंडियाने सेमीफायनलचे तिकीट निश्चित केले आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने स्पर्धेची सुरुवात दणदणीत केली. पहिल्याच सामन्यात भारताने युएईला तब्बल 234 धावांनी पराभूत केले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर 90 धावांनी विजय मिळवत भारताने ग्रुप A मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले.

Advertisement Box

रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात युएईने मलेशियावर 78 धावांनी मात केली. या निकालानंतर भारताची सेमीफायनलमधील जागा अधिकृतपणे पक्की झाली असून ग्रुप A मध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे. दुसरीकडे, सलग दुसऱ्या पराभवानंतर मलेशियाचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

पाकिस्तानसाठी सेमीफायनलचा मार्ग मोकळा…

अंडर-19 आशिया कप 2025 मध्ये ग्रुप A मध्ये भारत, पाकिस्तान, यूएई आणि मलेशिया हे चार संघ आहेत. पाकिस्तानने आपल्या पहिल्याच सामन्यात मलेशियावर तब्बल 297 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात भारताकडून 90 धावांनी पराभव झाला असला तरीही पाकिस्तानसाठी सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची दारे अजूनही उघडी आहेत.

पाकिस्तानला आता आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात तुलनेने कमकुवत यूएईचा पराभव करायचा आहे. या स्पर्धेत यूएईने दोन सामने खेळून एक विजय मिळवला आहे, तर पाकिस्ताननेही दोन सामन्यांत एक सामना जिंकला आहे. त्यामुळे 16 डिसेंबर रोजी होणारा पाकिस्तान–यूएई सामना निर्णायक ठरणार असून, या सामन्यातील विजेता संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे. सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानचे पारडे जड मानले जात आहे.

मलेशिया स्पर्धेतून बाहेर

नेट रनरेटच्या बाबतीत पाकिस्तान यूएईपेक्षा खूप पुढे आहे. मलेशियावर 297 धावांनी मिळवलेल्या विजयामुळे पाकिस्तानचा नेट रनरेट +4 पेक्षा जास्त झाला होता, जो भारताकडून पराभवानंतरही +2.070 आहे. दुसरीकडे, यूएईचा नेट रनरेट -1.608 आहे. त्यामुळे पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी फक्त यूएईवर विजय मिळवणे पुरेसे ठरणार आहे. या गटातील चौथा संघ मलेशिया असून, सलग दोन पराभवांमुळे तो आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

ग्रुप B काय आहे सेमीफायनलचं समीकरण?

ग्रुप B कडे पाहिल्यास या गटातील सर्व संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एकच सामना खेळला आहे. श्रीलंका पहिल्या तर बांग्लादेश दुसऱ्या स्थानावर आहे. पहिला सामना गमावलेला अफगाणिस्तान तिसऱ्या, तर नेपाळ चौथ्या स्थानावर आहे. अंडर 19 आशिया कप 2025 मध्ये ग्रुप स्टेजनंतर दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष ने अपने राहत कार्यक्रम की अगली किस्त जारी करने के लिए पाकिस्तान पर 11 नई शर्तें लगाई हैं। वैश्विक मंच पर क्या यह भारत की बड़ी जीत है?

Advertisement Box

मंगळवार, 3 मार्च 2026

आजचा सुविचार

यश हे अंतिम नाही आणि अपयश प्राणघातक नाही; महत्त्वाचे म्हणजे आपण सतत पुढे जाण्याचे धाडस ठेवता की नाही. प्रत्येक अडथळा आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतो, खाली पाडण्यासाठी नाही. धैर्य आणि हिमत हेच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहेत.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp