Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

इंधन स्वस्त होणार? इराणकडून भारताला मोठी ऑफर, 7 वर्षांनंतर पहिल्यांदाच…

Iran India Trade : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील काही तात्पुरते निर्बंध हटवले आहेत. त्यानंतर आता इराणने भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीची ऑफर दिली आहे. याची माहिती जाणून घेऊयात.

अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले रोखल्याची घोषणा केली आहे. तसेच युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे, मात्र तरीही दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ला सुरूच आहेत. या युद्धामुळे जगासमोर ऊर्जा संकट उभे राहिले आहे. हे कमी करण्यासाठी इराणवरील काही तात्पुरते निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यानंतर आता इराणने भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीची ऑफर दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Advertisement Box

2019 पासून इराणकडून तेल खरेदी नाही

रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, बिझनेल क्षेत्रातील 3 सूत्रांनी सांगितले की, इराणमधील व्यापाऱ्यांनी भारतीय रिफायनरी कंपन्यांना ICE ब्रेंटच्या तुलनेत प्रीमियम दराने इराणी तेल खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आयात करणारा आणि वापरणारा देश आहे. मात्र, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताने 2019 नंतर इराणकडून तेल खरेदी बंद केली होती

होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने संकट वाढले

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगातील अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेली होर्मुज सामुद्रधुनी बंद झाली आहे, ज्यामुळे इंधन संकट अधिक तीव्र झाले आहे. यामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याचा परिणाम म्हणजे तेलाच्या कमतरतेसोबतच भारतात एलपीजीचीही गंभीर टंचाई निर्माण झाली आहे.

तेल खरेदीबाबत सूत्रांनी काय म्हटले?

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतातील रिफायनरी कंपन्यांना इराणकडून एलपीजी आणि कच्चे तेल खरेदी करण्यासाठी सुमारे एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे. अमेरिकेचे निर्बंध सैल झाल्यानंतर रिफायनऱ्यांनी लाखो बॅरल रशियन तेल आधीच खरेदी केले आहे. इराणी तेल ICE ब्रेंटपेक्षा प्रति बॅरल 6 ते 8 डॉलर प्रीमियम दराने ऑफर केले गेले आहे, ज्याचे पैसे माल पोहोचल्यानंतर सात दिवसांत द्यावे लागतील. व्यापारी आणि इराणी नॅशनल ऑइल कंपनी डॉलरमध्ये पेमेंटची मागणी करत आहेत, तर काहीजण भारतीय रुपयांत पेमेंट स्वीकारण्यासही तयार आहेत अशी माहितीही समोर आली आहे.

तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सवलत

अमेरिकेने इराणी तेलावर निर्बंध लादले होते. मात्र ट्रम्प प्रशासनाने शुक्रवारी समुद्रात असलेल्या इराणी तेलाच्या खरेदीसाठी 30 दिवसांची सवलत जाहीर केली आहे. ही सवलत 20 मार्च ते 19 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्यामुळेच इराणने भारताला ही तेल खरेदीची ऑफर दिली आहे.

🚀 मुंबई पोस्ट न्यूज सोबत पत्रकारिता करण्याची संधी! आत्ताच जुळा!

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आजच्या फोकसमध्ये

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आजच्या फोकसमध्ये

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आजच्या फोकसमध्ये

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आजच्या फोकसमध्ये

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई
आजच्या फोकसमध्ये

Raid 2 Collection Day 23: बॉक्स ऑफिस पर मजबूत हुई ‘रेड 2’ की पकड़, 23वें दिन की शॉकिंग कमाई

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार
आजच्या फोकसमध्ये

गोवा में अंतरराष्ट्रीय पर्यटकों की संख्या में आई कमी, भाजपा विधायक बोले- इसके लिए इडली-सांभर जिम्मेदार

आजचे राशीफळ

वोट करें

अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष ने अपने राहत कार्यक्रम की अगली किस्त जारी करने के लिए पाकिस्तान पर 11 नई शर्तें लगाई हैं। वैश्विक मंच पर क्या यह भारत की बड़ी जीत है?

Advertisement Box

गुरुवार, 26 मार्च 2026

आजचा सुविचार

नातेसंबंध काचेसारखे नाजुक असतात, ते प्रेम, आदर आणि विश्वासाने पोसणे आवश्यक आहे. शब्दांचा वापर विचारपूर्वक करा, कारण एकदा बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. प्रत्येक नात्याला काळजी आणि संवादाची आवश्यकता असते.

Advertisement Box

और भी पढ़ें

WhatsApp